आमच्या विद्यालयात आज ५१ कर्णबधिर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यालय सर्व जाती-धर्माच्या कर्णबधिर मुलामुलींसाठी खुले आहे.
इ १लीच्या अगोदर ५ पायर्या व इ. १ली ते ४थी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. लीप रिडींग, शब्दोच्चार व करपल्लवीचा वापर करीत या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.
या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच खेळ, नॄत्य इ. चे शिक्षण दिले जाते. या विद्यार्थांना चित्रकलेच्या पहिल्या दोन परीक्षांना बसविले जाते व त्यात ती सर्व मुले यश मिळवितात.
विद्यालयाती विद्यार्थी विविध क्रीडा-स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर ही अनेक बक्षीसे मिळवितात.
हे कर्णबधिर विद्यार्थी स्वतःचे पायावर उभे रहावेत या हेतूने विद्यालयातील मुलांना शिवणकाम, भरतकाम, फाईल तयार करणे, मेणबत्त्या बनविणे असे छोटे-छोटे हस्तव्यवसाय शिकविले जातात.
