सुहॄद मंडळ पुणे यांच्या प्रेरणेने दापोलीतील तळमळीचे कार्यकर्ते डॉ. जी. व्ही. काणे व त्यांच्या सहकार्यांनी अपंगांच्या कल्याणासाठी २६ फेब्रुवारी १९८४ रोजी, स्नेहदीप दापोली ही संस्था स्थापन केली व लगेच १२ जुलै १९८४ रोजी फार मोठे स्वप्न डोळ्यात घेऊन ५ मुलांसह व एका प्रशिक्षीत शिक्षीकेसह कर्णबधिर विद्यालय सुरु केले. तसेच ०१ डिसेंबर १९८५ पासून विद्यार्थांसाठी वसतिगॄह चालू केले.
आर्थिक चणचण असूनही दुर्दम्य आशावाद आणि या अपंग मुलांच्या प्रती असलेली तळमळ याचे बळावर विद्यालयाचे हे रोपटे वाढीस लागले.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेली निवासी शाळा म्हणून विद्यलयाला १ एप्रिल १९८५ पासून शासनमान्यता मिळाली.
आज विद्यालय वसतिगॄहासह स्वतःच्या छोट्या इमारतीत असून दापोली शहराच्या मध्यवर्ती भागात ३१.२० आर् जमीन महाराष्ट्र शासनाने स्नेहदीप संस्थेला दिली आहे.
स्नेहदीप संस्थेने प्रचंड मेहनत करून हे विद्यालय प्रगतिपथावर आणले

