१ डिसेंबर १९८५ रोजी सुरू झालेले हे वसतिगृह आज ४५ मुला-मुलींना मायेची उबदार सावली देत आहे. वसतिगृहात राहण्याची व भोजनाची व्यवस्था विनामोबदला आहे. सर्व विद्यार्थ्यांना ताजे, सकस व शाकाहारी जेवण जसे आमटी, भात, पोळ्या, भाजी २ वेळा, १ वेळा पोहे, शिरा, खिचडी असा नाष्टा व २ वेळा चहा दिला जातो. सर्व वसतिगृहात लाईट, पंखे असून मुलाना झोपण्यासाठी कॉटस् गाद्या इ. साहित्य आहे. मुलांना खेळण्यासाठी विद्यालय व वसतिगृह यामध्ये ग्राऊंड आहे. वसतिगृहातच वसतिगृह अधिक्षक राहतात. मुलांचे खेळ घेणे, संध्याकाळी व्यायाम घेणे इ. गोष्टी येथे रोज केल्या जातात. वसतिगृहाचा परिसर हा नेहमीच स्वच्छ व नीटनेटका असतो. विद्यालयात व वसतिगृहात मुलांची देखभाल करणे, त्यांची काळजी घेणे, जेवण करणे यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग आहे.
सर्व मुलांची नियमीत वैद्यकीय तपासणी होते. मुलांच्या आजरपणात मानद वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात. आजारपणात घरच्यापेक्षा जास्त मायेने काळजी घेतली जाते.
