आम्ही असे पुढे जाणार
आज ५१ मुलामुलींचे असलेले हे घरकुल शिक्षणाबाबत, सोई-सुविधांबाबत व स्वावलंबनासह अद्ययावत असावे असे आम्हाला वाटते. म्हणून विद्यालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचा संकल्प संचालक मंडळाने सोडला आहे. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने व आमच्या उदार हितचिंतकांच्या सहकार्याने तो नक्कीच पूर्णत्वाला जाईल.
हे काम अवघड असले तरी अशक्य नाही असा आमचा ठाम विश्वास आहे.
या कर्णबधिर मुलांच्या स्वावलंबनासाठी १८ वर्षावरील व्यक्तींसाठी कार्यशाळा सुरु करावयाची आहे. यासाठी सुतारकाम, वेल्डींग, प्लंबिंग याचे अद्ययावत प्रशिक्षण द्यावयाचे आहे. या मुलांना सुसज्ज संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु करावयाचा आहे. तसेच ब्युटिशिअन, केशकर्तन, इस्त्री करणे, खाद्यपदार्थ बनविणे, माळीकाम यातही मुलांना पारंगत करायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कोणीही कर्णबधिर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या साठी आम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत.
