आमच्या या कर्णबधिर पाखरांच्या पंखात बळ येण्यासाठी आम्हाला आपली फार मोठी मदत हवी आहे. आपण या संस्थेसाठी व विद्यालयासाठी हे करू शकता की जेणेकरून या संस्थेची प्रगती आणखी जोमाने होईल.
- आपण स्वतः आर्थिक मदत करून, ओळखीच्या अन्य व्यक्ती तसेच संस्थांकडून मदत मिळवून देऊन.
- देणगीरूपाने निरनिराळ्या वस्तू देऊन.
- कर्णबधिर विद्यालयात कर्णबधिर मुलांना प्रवेशासाठी प्रवृत्त करून.
- विद्यालयाच्या माजी विद्यार्थांना शक्य असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन
- विद्यालयातील एका विद्यार्थ्याचा खर्च करून ज्यामध्ये जेवण, नाष्टा, राहणे, शैक्षणिक साहित्य, युनिफॉर्म, श्रवणयंत्र इ. चा समावेश असेल.
(स्नेहदीपला मिळणार्या देणग्या आयकर अधिनियम ८०जी अन्वये सवलत पात्र आहेत.)
